(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण माऊलींच्या पुण्यतिथी सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न होतोय. २८ सप्टेंबर ते एक आक्टोंबर या पाच दिवसाच्या काळात सोहळ्याचा कालावधी आहे. आज सोमवार दिनांक २९ रोजी दुपारी साडेचार वाजता आध्यात्मिक आणि आरोग्य या विषयावर डॉक्टर सचिन मेटकरी यांची व्याख्यान होणार आहे.
यानंतर रात्री ठीक आठ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ओविकार शाहीर सत्यवान गावडे यांचा श्री बाळकृष्ण माऊली यांचे जीवनावर आधारित धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यानंतर उद्या मंगळवार दिनांक ३० रोजी बाळकृष्ण माऊलींच्या पालखीची भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत अनेक संस्कृती कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये “अघोरी” ही लोककला हे या पालखी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे. परवा बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी बाळकृष्ण माऊलींवर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन माऊली सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
