सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क..
ग्रामीण भागात पतसंस्थांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, त्या केवळ आर्थिक मदत करणाऱ्या संस्था नसून सामाजिक व आर्थिक विकासाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यांचा सक्षमीकरणासाठी योग्य वापर झाला, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलू शकतो. असे प्रतिपादन नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथील श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांनी केले. नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे जयसिंग माऊली महिला पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयसिंग माऊली पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दामाजीचे संचालक भिवा दोलतडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अशोक चौंडे, कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, जयसिंग माऊली पतसंस्थेचे मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य काशिलिंग करे हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेसाठी पतसंस्था एक विश्वासार्ह पर्याय – सोमनाथ आवताडे
ग्रामीण भागातील आर्थिक विकासात पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढ्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शेतीसाठी लागणारा भांडवला असो, उद्योजकतेसाठीची मदत असो वा आपत्कालीन गरजांसाठीचा आधार असो, पतसंस्था ग्रामीण जनतेसाठी एक विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत बँकिंग सुविधांचा अभाव, कडक कर्जप्रक्रिया आणि व्याजदरांचा बोजा यामुळे अनेक शेतकरी व लघुउद्योजक बँकांपासून दूर गेले. अशा वेळी स्थानिक पातळीवर कार्यरत पतसंस्थांनी अल्प व्याजदराने, सोप्या अटींवर कर्ज देऊन लोकांना दिलासा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर कुंभार यांनी केले. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब गरंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष आण्णासाहेब गरंडे, पोलीस पाटील संजय गरंडे, बबलू गरंडे, दत्ता साबणे, अमोल शिंदे यांचेसह नंदेश्वर गावातील व तसेच परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी संस्थांचे चेअरमन ग्रामपंचायतींचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
