मंगळवेढा/ विशेष प्रतिनिधी : जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटाच्या आगामी निवडणुकीत शितल अंकुश डांगे यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असून, त्यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचा प्रभाव संपूर्ण गटात ठळकपणे जाणवतो आहे. आंधळगावचे माजी उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी ग्रामविकासाला गती दिलीच; शिवाय क्रांती महिला बहुउद्देशीय संस्था, संत रोहिदास महिला दूध संस्थेच्या चेअरमन आणि बंधन महिला बचत गट माध्यमांतून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला ठोस दिशा दिली आहे.

समाजकारणाची भक्कम पायाभरणी करून राजकारणात पाऊल टाकलेल्या शितल डांगे यांचे पती अंकुश डांगे यांना पंचायत समितीचे माजी सभापती कै. दत्ताजीराव भाकरे यांच्या आदर्श कार्याची प्रेरणा लाभली आहे. जनतेसाठी निःस्वार्थ काम हाच राजकारणाचा खरा अर्थ या विचारावर ठाम राहून त्यांनी विकासकेंद्री वाटचाल सुरू ठेवली आहे. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या आवताडे कुटुंबाशी एकनिष्ठपणे काम करत त्यांनी समाजकारणातून जनविश्वास मिळवला आहे. तसेच जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या विचारांचा कार्यभाग या भागात रुजवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
डांगे कुटुंबाची विकासपरंपराही तितकीच ठोस आहे. शितल डांगे यांच्या सासूबाई व अंकुश डांगे यांच्या मातोश्री शांताबाई डांगे यांनी आंधळगावच्या उपसरपंचपदावरून गावविकासाची ठसा उमटवणारी कामे केली. अंकुश डांगे हे सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत असून, लक्ष्मी दहिवडी गटात शितल अंकुश डांगे या प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असल्या, तरी या संपूर्ण सामाजिक-राजकीय वाटचालीमागे अंकुश डांगे यांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे चित्र आहे. राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत अंकुश डांगे यांनी गेल्या अनेक वर्षांत गावागावांत विश्वासाचं मजबूत जाळं उभं केलं आहे.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना त्यांनी केवळ कागदोपत्री भूमिका न निभावता, प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे या बाबतीत त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सर्वश्रुत आहे. एखादी योजना रखडली, काम अडले किंवा प्रशासकीय अडथळे निर्माण झाले, तरी तालुका व जिल्हा पातळीवर जाऊन काम मार्गी लावण्याची त्यांची हातोटी कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.

भागातील कोणताही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अथवा शैक्षणिक कार्यक्रम असो अंकुश डांगे हे आवर्जून पुढे असतात. मदतीचा हात, मार्गदर्शनाचा शब्द आणि संघटनात्मक ताकद देत त्यांनी अनेक तरुणांना घडवलं आहे. त्यामुळेच काम करणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, राजकारणात नेहमीच सरशी ठरणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
याच भक्कम पायावर शितल अंकुश डांगे यांची उमेदवारी उभी राहत असल्याने लक्ष्मी दहिवडी गटात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. अंकुश डांगे यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाची साथ, सामाजिक बांधिलकी आणि लोकांशी थेट नातं यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत हा उमेदवार गटाच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आंधळगावसह लक्ष्मी दहिवडी, गुंजेगाव, शेलेवाडी, अकोले, मारापुर, घरनिकी, शरदनगर, देगाव परिसरातून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी वाढता जनसमर्थनाचा सूर ऐकू येत आहे. एकंदरीत, समाजकारणातून घडलेलं,अनुभवसंपन्न आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून सौ. शितल अंकुश डांगे या लक्ष्मी दहिवडी गटातील जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्वात ठळक प्रमुख दावेदार ठरत आहेत.























