सोलापूर आजतक स्पेशल✍️✍️
भोसे जिल्हा परिषद गटातून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची दाट शक्यता असून, तसे संकेत सध्या राजकीय वर्तुळात मिळत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दृष्टिक्षेपात येऊ लागल्यापासून भैरवनाथ शुगर कारखान्याची यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनिल सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून विरोधकांनी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे.

अनिल सावंत यांचे सर्वच क्षेत्रात बहुमोल योगदान..
भोसे जिल्हा परिषद गटात समाविष्ट असलेल्या लवंगी गावात अनिल सावंत यांचा भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना असून, या कारखान्यात भोसे गटातील विविध गावांतील जवळपास २०० कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती झाली असून, याचा सकारात्मक परिणाम अनिल सावंत यांच्या सामाजिक व राजकीय प्रतिमेवर होत असल्याचे दिसून येते. अनिल सावंत यांनी केवळ उद्योग व राजकारण क्षेत्रापुरतेच मर्यादित न राहता या परिसरातील गोरगरीब, गरजू नागरिकांना वेळोवेळी आर्थिक व सामाजिक मदत केली आहे. शेतकरी, कामगार, युवक व महिलांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले असून, त्यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना आहे.

अनिल सावंत यांच्या नावाची चर्चा अन् हालचालींना वेग..
क्रीडा क्षेत्रातही अनिल सावंत यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी क्रीडा स्पर्धा, मैदाने व खेळाडूंना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक क्षेत्रात शिक्षण, आरोग्य व सार्वजनिक विकासकामांमध्येही त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे भोसे गटात अनिल सावंत यांना मानणारा मोठा गट अस्तित्वात आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, भैरवनाथ शुगरची सक्रिय यंत्रणा पाहता राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. आगामी काळात अनिल सावंत यांची भूमिका आणि निर्णय भोसे जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र आहे.




















