टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कसल्याही परिस्थितीत माघार न घेता अनिल सावंत हे आपले अधिकृत उमेदवार आहे आणि त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात मी दोन सभा घेणार आहे. सभेच्या तारखा लवकरच तुम्हाला सांगितले जाणार असल्याचेही यावेळी भेटीदरम्यान खासदार शरद पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला केले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी यांनी दिली आहे.
आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्याचे राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यामध्ये दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. सुतारीचा एबी फॉर्म अनिल सावंत यांना मिळाला आहे तर हाताचा पंजा मिळाला आहे. यासंदर्भात दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीचे शिष्ट मंडळ खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट सांगितला असल्याची माहिती मिळत आहे. आणि यानुसार दोन्ही शहर व ग्रामीण भागात सध्या तुतारीची हवा असल्याची माहिती दिली आहे. यानंतर शिष्टमंडळाने आपला मोर्चा अकलूज कडे वळविला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सोबत देखील चर्चा केली. यावेळी मोहिते पाटील यांनी अनिल सावंत यांच्या विजयासाठी कामाला लागण्याची आदेश दिले आहेत.
