Homeताज्या बातम्याजिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने...

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते सन्मान, सोलापूर जिल्ह्यातील विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते बंडू गडदे यांचा करण्यात आला सन्मान
दैनिक दामाजी एक्सप्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “सोलापूर भूषण पुरस्कार २०२६” या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजता सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या सोहळ्यात प्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते बंडू गडदे यांना सन्मानचिन्ह, शाल आणि फेटा देऊन गौरविण्यात आले. यावेळी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे हे प्रमुख उपस्थित म्हणून व्यासपीठावर होते.

बंडू गडदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली दर्जेदार शिक्षणाची सोय
बंडू गडदे यांनी शिरनांदगी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंडियन गुरुकुल स्कूल, आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज तसेच सैनिकी निवासी पॅटर्न स्कूल यांसारख्या संस्थांची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेषतः सैनिकी पॅटर्न स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्वगुणांची जडणघडण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

कार्यक्रमासाठी विविध स्तरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बंडू गडदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या योगदानाला सलाम केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा पुरस्कार केवळ बंडू गडदे यांच्यासाठीच अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन इतरांनीही शिक्षण क्षेत्रात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

हा माझा एकट्याचा सन्मान नसून आमच्या शाळेच्या प्रत्येक घटकाचा सन्मान आहे – बंडू गडदे
हा मिळालेला ‘शिक्षण भूषण’ सन्मान माझ्यासाठी वैयक्तिक नसून आमच्या संपूर्ण शैक्षणिक परिवाराचा आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या एकत्रित परिश्रम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले आहे. या सन्मानामागे सर्वांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी सर्वांना समर्पित करतो. भविष्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!