टीम सोलापूर आजतक
राष्ट्रीय समाज पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते पंकज देवकते यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंकज देवकते यांनी पक्षात प्रवेश केल्यापासून पक्षाची धुरा अत्यंत समर्थपणे पेलली आहे. एक सच्चा बहुजन कार्यकर्ता अशी ओळख पंकज देवकते यांची आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे पक्षातील आश्वासक चेहऱ्यांना संस्थापक आमदार महादेव जानकर यांच्या वतीने उमेदवारी बहाल करून विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधण्यात आला आहे. पंकज देवकते यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी हेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण पंकज देवकते आणि दामाजी मेटकरी यांच्यात एकमत होऊन अखेर पंकज देवकते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पक्षात ठरले आहे त्यामुळे पंकज देवकते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी युवक जिल्हा सरचिटणीस तातोबा गरंडे, ओंकार घोडके, बाळासाहेब लवटे, नामदेव काशीद प्रशांत घोडके, बापूसाहेब गडदे, सागर शिंगाडे, बिरदेव सलगर, माळाप्पा खांडेकर, सतीश सलगर, मंगळवेढा तालुका अध्यक्ष संजय कुमार वाघमोडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष संजय लवटे, युवक तालुकाध्यक्ष वैभव गडदे, विकास दुधाळ, दत्ता काळे, लखन साळवे हे यावेळी उपस्थित होते.
