सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
नंदेश्वर गावातील चार होतकरू युवकांनी कठोर परिश्रम करून भारतीय सैन्य दलात उज्ज्वल यश संपादन केले. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीचा सन्मान सद्गुरु माऊली महिला पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.

नंदेश्वर गावात व्यक्त होतोय आनंद..
भानुदास सुभाष मेटकरी, कुंडलिक दादा मोटे, साहिल शंकर कसबे आणि शुभम लक्ष्मण कळकुंबे या युवकांची भारतीय सैन्यात निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या चारही युवकांचा सत्कार पतसंस्थेचे मार्गदर्शक मारुती भुसनर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग दोलतडे व शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले यश..
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटी व मेहनतीच्या जोरावर या युवकांनी मिळविलेले यश ही सर्वांसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. भारतीय सैन्यदलात प्रवेश करून गावाचे, तालुक्याचे तसेच राज्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल युवकांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमास यावेळी सोन्या घोड्याचे मालक लक्ष्मण कांबळे, दाजी कसबे, दादा मोटे,सोमनाथ चौगुले, लक्ष्मण रणदिवे, ओंकार नरळे, वैभव निळे, साक्षी चव्हाण गावातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























