टीम सोलापूर आजतक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारीवरून बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. भैरवनाथ शुगरचे व्हा चेअरमन अनिल सावंत हे आज दुपारी दोन वा. पंढरपूर येथील तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी खासदार शरद पवार यांनी अनिल सावंत यांना बोलावून घेऊन अर्ज दाखल करायला सांगितला असल्याची माहिती अनिल सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान काल काँग्रेस पक्षाच्या वतीने भगीरथ भालके यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारी भालके यांना मिळाली असल्या मुळे त्यांचे कार्यकर्ते उत्साहात होते आणि मतदारसंघात यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. मात्र यानंतर अनिल सावंत यांच्या भूमिकेकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागले होते. यात आज सकाळी शरद पवार यांनी गोविंद बाग येथील आपले निवासस्थानी बोलवून घेऊन राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात सूचना दिले आहेत. त्यानुसार आज अनिल सावंत हे अर्ज दाखल करणार आहेत यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चिन्हे आहेत.
यावेळी अनिल सावंत यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा, चंद्रशेखर कोंडभैरी, रंधवे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
