Homeक्राईमखळबळजनक ! वाद मिटवण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना मंगळवेढ्यात...

खळबळजनक ! वाद मिटवण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना मंगळवेढ्यात मारहाण…..

मंगळवेढा (प्रतिनिधी) शुद्ध पाण्याच्या फॅक्टरीवरून बहिण व भावातील वादातून भांडण झाले. या प्रकरणी बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून वडिल, भावासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान वाद मिटवण्यासाठी गेलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी राधिका किरण जाधव (वय ३२ रा. सिध्देवाडी, ता. पंढरपूर) यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्यादी दिली असून या प्रकरणी फिर्यादीचे वडील दादासो बाळकृष्णा बर्गे, (वय ५५), भाऊ बाबूराव दादासो बर्गे (वय ३३) व भावजय आश्विनी बाबूराव बर्गे (वय ३०) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राधिका जाधव त्यांचे पती यांचा पॅक बंद पाणी बॉटलचा पृथ्वीराज एंटरप्रायजेस या नावाने लक्ष्मी दहिवडी येथे वॉटर प्लांट व्यवसाय आहे. फिर्यादीच्या भावाचाही याच ठिकाणी स्मार्ट परी या नावाने पॅक बंद पाणी बॉटलचा व्यवसाय आहे.
कंपनीत फिर्यादीचा भाऊ बाबूराव बर्गे हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता. परंतू काही दिवसापासून फिर्यादीच्या भावाने कंपनीमध्ये मालकी हक्क सांगू लागल्याने फिर्यादीने मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कंपनी काही दिवस बंद ठेवली होती.
दरम्यान ५ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी दहिवडे येथीलवॉटर प्लांट कंपनीत फिर्यादी, त्यांचे पती किरण जाधव, पतीचे मित्र प्रभाकर देशमुख, दत्तात्रय पवार गेले असताना फिर्यादीची परवानगी न घेताच बेकायदेशीररित्या स्मार्ट परी पाणी बॉटलचे उत्पादन सुरू असल्याचे दिसून आले.

दरम्यान त्याठिकाणी फिर्यादीचे वडील, भाऊ व भावजय आली. आणि त्यांनी तू इथे का आलीस? म्हणून फिर्यादीस मारहाण करुन गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तोडून घेतले.

दरम्यान फिर्यादीच्या पतीचे मित्र प्रभाकर देशमुख हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ईद-हुल-फितर 2025: 5 लिप-सॅमॅकिंग कबाब रेसिपी आपल्या अतिथींना प्रभावित करण्यासाठी या ईद

ईद -यूएल -फितर अगदी कोप around ्याच्या आसपास आहे आणि हवेत खळबळ आहे. आम्ही आमच्या प्रिय ओनचे स्वागत करण्याची आणि स्वादिष्ट मेजवानीत गुंतण्याची तयारी...

ईद-हुल-फितर 2025: 5 लिप-सॅमॅकिंग कबाब रेसिपी आपल्या अतिथींना प्रभावित करण्यासाठी या ईद

ईद -यूएल -फितर अगदी कोप around ्याच्या आसपास आहे आणि हवेत खळबळ आहे. आम्ही आमच्या प्रिय ओनचे स्वागत करण्याची आणि स्वादिष्ट मेजवानीत गुंतण्याची तयारी...
error: Content is protected !!