Homeक्राईमदारूच्या व्यसनाला वैतागून भावानेच घेतला भावाचा जीव, नंदेश्वर येथील घटनेने मंगळवेढा तालुक्यात...

दारूच्या व्यसनाला वैतागून भावानेच घेतला भावाचा जीव, नंदेश्वर येथील घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील मोटेवस्तीमध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दारूच्या व्यसनामुळे सतत त्रस्त असलेल्या कुटुंबात अखेर मोठ्या भावाचा लहान भावाकडून कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाळू धोंडीबा मोटे (वय 60) हे आपल्या पत्नी, मुले, सुना आणि नातवंडांसह शेतातील मोटेवस्ती येथे वास्तव्यास आहेत. दि. 10 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास कृष्णात हा दारूच्या नशेत घरी आला आणि नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने स्वतःच्या मुलालाही मारहाण केली. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वाद पुन्हा उफाळून आला. संतप्त अवस्थेत कृष्णातने घरातील कुऱ्हाड उचलून कुटुंबीयांना धमकावण्यास सुरुवात केली. या परिस्थितीत घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी लहान भाऊ दत्तात्रय मोटे (वय 25) याचा संयम सुटला. त्याने कृष्णातच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि रागाच्या भरात त्याच्यावर डोक्यावर तसेच दोन्ही पायांवर जोरदार वार केले.

या हल्ल्यात कृष्णात गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्यातून व पायांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तातडीने कुटुंबीयांनी त्याला खाजगी वाहनाने मंगळवेढा येथील साई समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, कुटुंबीयांनी त्याला सांगोला येथील सदगुरु हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे नंदेश्वर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाचा झालेला हा दुर्दैवी अंत सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे. गावकऱ्यांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला.

कृष्णातच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंबीय प्रचंड त्रस्त
कृष्णात मोटे हा काही वर्षांपूर्वी पुणे येथे रोजगारासाठी गेला होता. मात्र, कोरोनाच्या काळात तो गावाकडे परतला आणि त्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले. गेल्या चार वर्षांपासून त्याच्या या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. कृष्णात हा दररोज मद्यप्राशन करून घरी येत असे आणि पत्नी, मुले तसेच आई-वडिलांवर शिवीगाळ व मारहाण करत असे. कुटुंबीयांनी अनेक वेळा त्याला नशामुक्ती केंद्रात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तयार झाला नाही. त्याच्या या वागणुकीमुळे त्याची पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली होती, तर लहान भाऊ दत्तात्रय काही काळ घरापासून दूर राहत होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज…नंदेश्वर येथील बेपत्ता वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू,आठ दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम अखेर ठरली...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भागवत शंकर कसबे (वय ७५) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी...

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

error: Content is protected !!