नंदेश्वर /प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. दक्षिण भागाचे मातब्बर नेते माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, रड्डे गावाचे माजी सरपंच सुरेश कांबळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, नंदेश्वर ग्राम पंचायतीचे विद्यमान उपसरपंच आनंदा पाटील, माजी उपसरपंच अंकुश कांबळे यांनी सावंत यांना पाठिंबा दिला आहे. या दिलेल्या पाठिंबामुळे अनिल सावंत यांचे दक्षिण भागात ताकद वाढली असल्याची प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सावंत यांना पंढरपूर तालुक्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याशिवाय मंगळवेढा तालुक्यात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. याशिवाय अनिल सावंत यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे दिसत आहे. सुरुवातीला नवखे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते पण आजच्या घडीला सर्वच उमेदवारांच्या पुढे ते असल्याचे दिसत आहे.
**************
महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाला लाभलेले एक विकास प्रिय नेतृत्व आहे. त्यांची काम करण्याची पद्धत पाहूनच आहे त्यांना पाठिंबा दिला आहे. आगामी काळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याची योग्यता फक्त अनिल सावंत यांच्यामध्येच आहे. आणि ही गोष्ट मतदार संघातील सर्व मतदार यांच्या लक्षात आल्यामुळे अनिल सावंत हे भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. आम्ही त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू.
धनाजी गडदे
धनगर समाज नेते
