Homeराजकीयरड्डे गणातून आकाश डांगे यांना उमेदवारी द्यावी - बालाजी सुपनर यांची आ.समाधान...

रड्डे गणातून आकाश डांगे यांना उमेदवारी द्यावी – बालाजी सुपनर यांची आ.समाधान आवताडे यांच्याकडे मागणी

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे पंचायत समिती गणातून भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी रड्डे गावातील युवा नेते बालाजी सुपनर यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली आहे.
यावेळी बोलताना सुपनर म्हणाले, रेड्डे गाव व परिसरातील दक्षिण भाग आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. अशा ठिकाणी आकाश डांगेसारखा निष्ठावंत, जातपात न पाहणारा कार्यकर्ता जर निवडून आला, तर गेल्या २० वर्षांचा आमचा संघर्ष संपेल. आकाश डांगे यांचे सामाजिक व राजकीय योगदान अधोरेखित करताना त्यांनी पुढे सांगितले की, दूध दरासाठी त्यांनी रक्ताने पत्र लिहिले होते. कोरोना काळात ज्या वेळेस लोकांनी आपल्या नातेवाइकांपासूनही तोंड वळवलं, त्या वेळेस आकाश डांगे यांनी गावातील अनेक कोरोना रुग्णांना मदत केली, अनेकांचे अंतिम संस्कारही स्वतः पुढाकार घेऊन केले. अशा प्रकारचे नेतृत्व संपूर्ण तालुक्यात दुर्मीळ आहे.

कामसू नेतृत्व..
सुपनर पुढे म्हणाले, ज्यांना कलेक्टर ऑफिस कुठे आहे हेही माहीत नाही, अशांना उमेदवारी देण्यात काहीही अर्थ नाही. मंत्रालयात जावून आ.समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे प्रश्न सोडविणारे, लोकांची कामे धडाक्यात करणारे नेतृत्व म्हणजे आकाश डांगे. आमदार आवताडे यांनी जर अशा कार्यक्षम व विश्वासू तरुणाला संधी दिली, तर आम्ही जीव तोडून काम करून त्यांना विजय मिळवून देऊ.

सर्वांगीण विकासासाठी आकाश डांगे यांच्या उमेदवारीची मागणी..
तसेच, रड्डे गावासह परिसरातील इतर गावांतील सरपंच व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचेही सोपनर यांनी स्पष्ट केले. शेवटी निर्णय आमदार महोदयांचा असला, तरी आमच्या मागणीचा त्यांनी शंभर टक्के विचार करावा, अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली. रड्डे गणाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर आकाश डांगे यांच्याशिवाय दुसरा योग्य उमेदवार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!