Homeसामाजिकलोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा सोहळा शिवचिंदंबर मंगल कार्यालय, बारागाव नांदूर रोड, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे होणार आहे. लोहार समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे तसेच विविध क्षेत्रांत समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे. ‘शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल’ या विचारातून फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती‌‌
या सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष दशरथदादा पोपळघट, महाराष्ट्र शासनातील विक्रीकर सहायक आयुक्त गिरीजा शंकर पोपळघट, नगरसेविका मंगलताई प्रकाशराव नन्नवरे, नायब तहसीलदार राजेंद्र लाड, उपजिल्हाधिकारी ज्योतीताई कावरे, राज्य वीज कामगार संघटनेचे रघुनाथ लाड, तसेच अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष शांताराम (तात्या) लोखंडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पोपळघट यांचीही उपस्थिती राहणार आहे.प्रमुख उपस्थितांमध्ये अनिल हिवाळे, राजेंद्र लोखंडे, सोमनाथ हेरले, संतोष होशीनाथ पोपळघट, दीपक आगळे, प्रमाकर लाड, सुरेश बाबुराव हराळ, डॉ. रमेश रणशिंग, बाळासाहेब लोखंडे, डॉ. सुनील कावरे आदी मान्यवरांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तम माधवराव लोखंडेकर व संजय रामभाऊ इये यांचा ‘शिक्षणश्री’ सन्मान करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अनुराधा सचिन भालके यांचा ‘मायमाऊली सन्मान’, तर कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विलासराव धोरात यांचा ‘कलाश्री’ सन्मान करण्यात येणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी केतन दशरथ पोपळघट आणि सरिता गणपत जगताप यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुषार कैलास रणशिंग, प्रेम किरण इये आणि रिया सत्यवान कोळी यांचा गौरव केला जाणार आहे.

उद्योग क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाधान दिलीप आगळे, विनायक हरिभाऊ गाडेकर, संतोष तुकाराम पोपळघट आणि योगेश अर्जुन विघे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
याशिवाय पोलीस, आरोग्य, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही ‘विशेष सत्कार’ करण्यात येणार आहे. यामध्ये किशोर सुधीर लाड, अभिजीत म्हस्के, डॉ. प्रमोद धोरात, संदीप विघे, विशाल जवणे आणि डॉ. आकांक्षा गोक्षनाथ हळके आदींचा समावेश आहे.

या सोहळ्यात लोहार समाजातील विविध शैक्षणिक स्तरांवर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत विविध स्पर्धात्मक परीक्षा, उच्च शिक्षण, कला, क्रीडा, तंत्रज्ञान तसेच व्यावसायिक क्षेत्रात पुढे यावे, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले. लोहार समाजातील विद्यार्थी, पालक, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगरच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!