Homeक्राईमनराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी दोन वर्षे शिक्षा

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजार रुपये दंड, तसेच कलम ४२९ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत केला होता खून
सरकार पक्षाच्या माहितीनुसार, आरोपी संजय कोरे हा पत्नी सुरेखा हिच्या वागणुकीवर व चारित्र्यावर संशय घेत तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत होता. ३ डिसेंबर २०१७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपीने पत्नी सुरेखा हिला लोखंडी कांबीने डोक्यात मारून ठार केले. त्यानंतर जवळच जेवत असलेल्या एक वर्षांच्या मुलगी श्रावणी हिच्याही डोक्यात वार करून तिचा खून केला. तसेच घरातील तीन लहान मांजरांच्या पिल्लांचीदेखील लोखंडी कांबीने ठेचून हत्या केली.

खून केल्यानंतर गावात जाऊन स्वतःच दिली होती कबुली
घटनेनंतर आरोपीने गावात जाऊन आपण हे कृत्य केल्याचे काही ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. फिर्यादी सिद्धराम कांबळे, पंच समाधान वाघरे, राहुल कसबे, मयत सुरेखा हिचा भाऊ साधू विपुले, डॉ. भावेश पांडे, डॉ. प्रणव शेटे, पशुवैद्यकीय अधिकारी दत्ता मेटकरी, पोलीस कर्मचारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर केले. बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावत आरोपी संजय नागप्पा कोरे यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या गुन्ह्यातील इतर आरोपी नागप्पा कोरे व शारदाबाई कोरे यांची भारतीय दंड संहिता कलम ४९८(अ) मधून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी कामकाज पाहिले. तर मंगळवेढा विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शितापूरे व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिडे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन कामकाज पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!