मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल व क्रीडा साहित्य वितरण सोहळ्यात आमदार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना, “विद्यार्थ्यांना सायकली, खेळासाठी आणि योगासाठी किटचे वाटप करून रामेश्वर मासाळ यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे,” असे गौरवोद्गार काढले.
शाळा व गावाच्या विकासासाठी निधी देण्यास कटिबद्ध – आ. समाधान आवताडे
यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी शाळा व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या निधीची ग्वाही देत, “शाळेच्या विकासकामासाठी किंवा गावाच्या विकासासाठी जितका निधी लागेल तितका निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन दिले.
आ.समाधान आवताडे यांना मिळणारे समर्थन एखाद्या मंत्र्यालाही लाजविणारा आहे – रामेश्वर मासाळ
कार्यक्रमात बोलताना रामेश्वर मासाळ यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले. “आमदार समाधान आवताडे यांच्या कामामुळे मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात त्यांना मिळणारे जनसमर्थन हे एखाद्या मंत्र्यालाही लाजवेल असे आहे. भविष्यात अजितदादा यांच्याप्रमाणे लाख मताने निवडून यावेत अशा शुभेच्छा दिल्या.

५१ सायकली आणि तीनशे किटचे वाटप
या कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोणेवाडी, मासाळवाडी, गुंगेवाडी आणि मंडलेवस्ती येथील सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी व योगासाठी ३०० क्रीडा-योग किटचे वाटप करण्यात आले. तसेच वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेतून ५१ सायकलींचे वितरण करण्यात आले. याशिवाय उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती दिपालीताई ताड, जिल्हा परिषद सदस्या करुणाताई शिवशरण, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आशाताई पाटील, केंद्रप्रमुख विशाल जाधव, राजाराम सुडके, माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार, पाठखळचे सरपंच रुतुराज बिले, सरपंच बाबासाहेब मासाळ, उपसरपंच हणमंत बंडगर, माजी उपसरपंच तानाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सलगर, अंकुश बंडगर, सुरेश मासाळ, बंडू मासाळ, सुभाष कसबे, कांतिलाल मासाळ, ग्रामसेवक काटे भाऊसाहेब, पोलीस पाटील संजय मेटकरी, सोसायटी चेअरमन बंडू मासाळ, व्हाईस चेअरमन सुनिल चव्हाण, अनिल कसबे, रावसाहेब क्षिरसागर, रसुल मुलाणी, अशोक मासाळ, जयराम मासाळ, मनोहर मारकड, बबलू मासाळ, गणेश गवळी, बापू मासाळ, उत्तम मासाळ, नितीन कांबळे, दगडू मासाळ, नवनाथ गवळी, आण्णा मासाळ, नवाज तांबोळी, नंदू गवळी, सुखदेव काळे, बिरा गरंडे, दयानंद कोळी यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अवधूत क्षिरसागर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाऊसाहेब माने यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.























