Homeताज्या बातम्यानंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या...

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या विहिरीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, ही विहीर अत्यंत जुन्या अवस्थेत असून तिच्या भोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नाही. या विहिरीच्या अगदी लगतून श्री बाळकृष्ण विद्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता जात असल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या रस्त्याचे सध्या राज्य महामार्गामध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याचे रुंदीकरण करताना साईड पट्टी थेट विहिरीच्या भागात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही विहीर अधिकच धोकादायक बनली असून, रस्त्यावरील वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा याबाबत लक्ष वेधले असून, विहीर तातडीने बुजवून सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, नागरिकांची वाहतूक आणि भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

या गंभीर विषयावर ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी आणि पुढील निर्णय प्रक्रियेसाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली आहे. या ग्रामसभेत विहीर बुजविण्या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!