नंदेश्वर (प्रतिनिधी) आ.गोपीचंद पडळकर यांच्या हातातल्या या बेड्या त्यांनी दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी टेंभू योजनेचे कार्यालय फोडले होते म्हणून तत्कालीन भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारने घातल्या होत्या,सरकारला जेरीस आणायची धमक रक्तात असावी लागते,अन गोपीचंद पडळकर यांनी ते सत्तेत नसताना ही नेटाने केलं त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना गोपीचंद पडळकर कधीच समजणार नाही असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक तात्यासाहेब दोलतडे यांनी केले आहे.
टेंभूच पाणी मागण्यासाठी मंत्र्याना गावबंदी आंदोलन केलं त्यावेळी जयंत पाटील मंत्री होते,ते मुद्दाम गावबंदी केलेल्या गावात आले अन पडळकर सामोरे गेले,अन आंदोलन पेटलं व गोपीचंद पडळकर सह कार्यकर्त्यांना पोलिसांनी जनावरासारखं लाठ्या काठ्या ने ठोकून काढलं,अनेक कार्यकर्त्यावर जयंत पाटलांनी खोट्या केसेस टाकून त्यांचं आयुष्य बरबाद केलं,वेचून अठरा पगड जातीतील मुलांवर तडीपारीच्या केसेस त्या जयंत पाटलांनी केल्या. मंगळसूत्र चोरीच्या खोट्या गुन्ह्यात ही गोवलं.
एवढा त्रास या प्रथापितानी दिलाय की पोलिसांनी मारलेली काठी अंगाच कातडं काढल्याशिवाय राहत न्हवती. बरीच गावं अशी आहेत, त्या ठिकाणी जयंती सुद्धा साजरी करू दिल्या नाहीत. हवं तर गावांची यादी पण माझ्याकडे आहे. हे सगळं शरद पवार महाराष्ट्राचा कारभार पाहत होते त्यावेळी घडलेलं आहे.
अन म्हणून आम्ही बहुजनांची पोरं म्हणतो 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला येतो. असे 10-20 पवार हे फडणवीस खिश्यात घेऊन फिरतात, तुम्हा प्रस्थापितांचा माज उतरवणारच,शरद पवारांएवढा जातीयवादी माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही. आधी लेकीला राजीनामा दे म्हणावं, हजार मतांनी निवडून येणाऱ्या नातवाला राजीनामा द्यायला लावा. विनाकारन आमच्या बहुजनच्या पोरांना तुम्ही बळी देऊ नका.ही गोपीचंद पडळकरांची वाक्य द्वेषातून नसून त्याग अन त्यांनी केलेल्या संघर्षातुन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची बोलकी प्रतिक्रिया आहे. आणि हे म्हणतात यांना आमदारकीची लॉटरी लागलीय.
बहुजनांच्या पोरानं मिलेली आमदारकी, पदं ही लोटरी नाही. 20-20 वर्षे संघर्ष करून इथपर्यंत प्रवास केलाय.
गावकुसाबाहेर ठेवलेल्या अठरा पगड जातीच्या व बहुजनांच्या पोरांना सरंजामशहांच्या विरोधात हे बोलण्याची हिंमत देवाभाऊने दिलीय. एवढंच काय या प्रस्थापितनी ज्या ज्या बहुजनच्या पोरांना त्रास देण्याचं काम केलं, त्याना देवाभाऊंनी आपल्या बाहूखाली घेतलं आणि ताकत देण्याचं काम केलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी शेकडो लोकांचे प्राण गेले, रक्ताचे पाठ वाहिले, मग नाव मिळाले. पण तत्कालीन मुख्यमंत्री मा देवाभाऊंनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकारांचे नाव दिले. अहमदनगर ला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव दिले. कालच्या मंत्रिमंडळात असताना महाराष्ट्रातील 125 उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली.
मुलींना डिप्लोमा, डिग्री चे शिक्षण मोफत केले. म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना मानतात. फडणवीस मुख्यमंत्री नकोत म्हणून प्रस्थापितानी जीवाचा आटापिटा केला. कालच्या निवडणुकीत जयंत पाटील,शरद पवार,मोहिते सारख्याच्या सत्तेला सुरुंग लावण्याच काम पुढे या बहुजनांच्या पोरांनी नेटाने केलं,अन पवारांचा जातीयवाद संपवण्यासाठी या पुढे ही करतील.
कालचीच एक बातमी आहे की गोर गरिबांची मुलं ज्या रयत शिक्षण संस्थेत शाळा शिकतात त्या शाळेच्या खात्यावरील करोडो रुपये सुप्रिया सुळे यांच्या खात्यावर वर्ग केलेत. रयत शिक्षण संस्थेची घटनाच पवारसाहेबांनी बदलली आणि स्वतः अध्यक्ष बनले. तुम्हाला आम्हला बहुजनाला गरीब मराठा समज्याला पुढे जायचे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि आ. गोपीचंद पडळकर यांच्याशिवाय पर्याय नाही असेही तात्यासाहेब दोलतडे म्हणाले.
