Homeसामाजिकलढा गोरगरिबांसाठी..गायरान जमिनीवर राहणाऱ्या गोरगरीब लोकांच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी...

लढा गोरगरिबांसाठी..गायरान जमिनीवर राहणाऱ्या गोरगरीब लोकांच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांचा पुढाकार…

नंदेश्वर (प्रतिनिधी)
नंदेश्वर गावासह मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गायरान जमिनीवर राहणाऱ्या गोरगरीब लोकांना घरकुले मंजूर झाली आहेत. पण त्यांना घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने परवानगी मिळत नसल्याच्या मुख्य प्रश्नासह गोरगरीब लोकांच्या अनेक प्रश्नांसाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे आणि सोलापूर जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे प्रतिपादन मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना गडदे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील गोरगरीब लोक गेल्या ३० ते ४० वर्षांपासून गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत. शासनाच्या वतीने अनेकवेळा गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना त्यांचे अतिक्रमण नियमित करून देऊ अशी आश्वासने देण्यात आली आहेत. तसेच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अतिक्रमण करणाऱ्या लोकांना जागा देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
पण प्रत्यक्षात या सर्व लोकांना आता घरकुले मंजूर झाली आहेत. पण ग्रामपंचायतीच्या वतीने या सर्व लोकांना घरकुल बांधण्याची परवानगी मिळत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. इतकेच नाही तर काही दिवसांखाली या सर्व लोकांना अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात देखील ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या होत्या. एकीकडे शासनाच्या वतीने अतिक्रमणे नियमित करून देण्याच्या वल्गना होत आहेत.

तर दुसरीकडे तेच शासन ग्रामपंचायतींना अतिक्रमण केलेल्या लोकांचे अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यास सांगत आहे. गेल्या काही दिवसांखाली सर्व अतिक्रमणधारक आणि घरकुल लाभार्थी लोकांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मागवले गेले होते. पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकत्रित प्लॉट स्कीम द्वारे सर्व अतिक्रमण धारकांना जिथे ते गेल्या ३० ते ४० वर्षांपासून राहत आहेत तिथे जागा न देता इतर ठिकाणी एकत्रित जागा देण्याचा प्रस्ताव समोर आणला आहे. पण या लोकांना जिथे ते राहत आहे तर तिथेच जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे या सर्व प्रश्नांसाठी आम्ही लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे या सर्व समस्या मांडणार आहोत असे यावेळी बोलताना गडदे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!