(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे जयसिंग माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक नंदेश्वर ग्रामपंचायतीचे सदस्य काशिलिंग करे यांनी दिली आहे.
नंदेश्वर येथे जयसिंग माऊली महिला पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थित होणार उद्घाटन सोहळा…
श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती श्री बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून या सोहळ्यास आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांचेसह नंदेश्वर गावातील प्रमुख नेतेमंडळी, विविध संस्थांची पदाधिकारी, दूध संस्थांचे चेअरमन, विविध पक्षांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नंदेश्वर येथील नेताजी कळकुंबे दुकानाशेजारी कार्यक्रम होणार असल्याची माहिती काशिलिंग करे यांनी दिली आहे.





















