Homeताज्या बातम्यामंगळवेढा तालुक्यातील "ही" शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची सदिच्छा भेट व कौतुक

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रदीप खांडेकर यांनी केले.

प्रशालेस सदिच्छा भेट देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. उन्हाळी सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी अतिरिक्त तास घेऊन सातत्याने अध्यापन सुरू ठेवले. तसेच इतर शाळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सहज समजेल, ज्ञान आत्मसात करता येईल आणि त्यांच्या गुणवत्तावाढीस चालना मिळेल, अशी शिक्षण व्यवस्था निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षा तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रदीप खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी नंदेश्वर ग्रामपंचायतीचे सदस्य बाबुराव करे यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट देऊन प्रोत्साहन दिले. तसेच प्रशालेचे सहशिक्षक तानाजी लेंडवे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय खर्चासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. प्रशालेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यास पॅड व कंपासचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी दिसून आले.

दरम्यान, सहशिक्षक तानाजी लेंडवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने तसेच नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने प्रदीप खांडेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास नंदेश्वर येथील विविध पक्षांचे पदाधिकारी, नेतेमंडळी, ग्रामस्थ, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक चर्चा होत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!