Homeराजकीयसोलापूरात शिंदे सेनाला सर्वात मोठा दणका; या शिलेदाराचा ‘जय महाराष्ट्र’, काय व्यक्त...

सोलापूरात शिंदे सेनाला सर्वात मोठा दणका; या शिलेदाराचा ‘जय महाराष्ट्र’, काय व्यक्त केली खंत

(टीम सोलापूर आजतक)
: सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकहाती पक्ष बांधणी सुरू केली होती. अनेक दिग्गज नेते त्यांनी खेम्यात आणले होते. पण आता या बांधणीला सोलापूरात पहिला फटका बसला. शिंदे सेनेला या शिलेदाराने जय महाराष्ट्राचा सांगावा धाडला.
शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्हात मोठा धक्का बसला. आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंतानी पक्ष पदाचा राजीनामा सोपवला. गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीराव सावंत हे जिल्हा संपर्क पदावर कार्यरत होते. पण त्यांचे पक्षाशी सूर जुळले नसल्याचे समोर आले. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
*****************
काय केली व्यक्त खंत

पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सावंत यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील निर्णयात विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी याविषयीची तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठीकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली नसल्याने सावंतानी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अनेक समर्थकांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत.
******************
आता भूमिका काय?

शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्याने ते कोणता पक्ष जवळ करतात, काय भूमिका घेतात याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत यांना मंत्री पद मिळाले नाही. त्यानंतर शिवाजी सावंत यांना गेल्या वर्षी कार्यकर्त्यांनी आमदार करण्याची मागणी केली होती. सावंत यांनी गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासमोर चांगलेच शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर आता सावंत यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र ठोकला. आता त्यांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(स्त्रोत टीव्ही9 मराठी)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!