Homeताज्या बातम्यामंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे...

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे
श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.

माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा ह.भ.प. विठ्ठलदादा वासकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या गौरव सोहळ्यात विष्णुपंत आवताडे, पार्वती आवताडे, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिगंबर भगरे यांना ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दैनिक स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे, भीमराव मोरे हे उपस्थित होते.

दिगंबर भगरे यांनी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला आहे. स्थानिक प्रश्न, सामाजिक समस्या, जनतेच्या अडचणी तसेच मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध घडामोडींना प्रभावीपणे वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

पत्रकारितेबरोबरच गायन क्षेत्रातही दिगंबर भगरे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कराओके या गायन प्रकाराला त्यांनी लोकप्रियतेची वेगळी उंची मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या गायनाची आणि सांस्कृतिक उपक्रमातील सहभागाची राज्यभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

सामाजिक क्षेत्रातही दिगंबर भगरे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेणे आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.

पत्रकारिता, गायन आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे दिगंबर भगरे हे केवळ मंगळवेढा तालुक्याचे नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्काराने करण्यात आलेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याबद्दल दिगंबर भगरे यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!