Homeताज्या बातम्याधोकादायक.. रहदारीच्या गावात मुख्य चौकातील पुल बनला धोकादायक, पुलाचे रुंदीकरण करून उंची...

धोकादायक.. रहदारीच्या गावात मुख्य चौकातील पुल बनला धोकादायक, पुलाचे रुंदीकरण करून उंची वाढविण्याची मागणीसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे आक्रमक..

नंदेश्वर/ प्रतिनिधी
भोसे (ता.मंगळवेढा) येथील मुख्य चौकातील गैबी ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण करून पुलाची उंची वाढवण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. या मागणीची दखल घेत कार्यवाही न झाल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिला आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मंगळवेढा ते हुन्नूर रस्त्यावरील भोसे येथे बस थांबा शेजारी असणाऱ्या अरुंद ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण न करता रस्त्याचे काम चालू ठेवल्यामुळे रस्त्याची उंची वाढल्याने पुलावरील संरक्षक दगड रस्त्यात मुजल्याने मोठा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत असून सदर धोकादायक पुलाचे रुंदीकरण करूनच रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी भोसे येथील ग्रामस्थातून होत आहे. मंगळवेढा ते हुन्नूर रस्त्यावरती भोसे बस थांब्या शेजारी असणाऱ्या मुख्य चौकातील गैबी ओढ्यावरती जुना पूल आहे या पुलावरील रस्ता मुळातच अरुंद असल्याने वाहनाची कोंडी होते.सध्या पाटकळ ते रेवेवाडी त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुलाचे खोदकाम करून व रुंदीकरण होणे अपेक्षित असताना आहे त्या पुलावरून रस्त्यावरती खडीकरणाचे तीन थर घेतल्यामुळे या पुलावरील संरक्षण दगड देखील रस्त्यात मोजून गेले असल्याने वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. संरक्षण पुलावरील संरक्षक दगडच गायब झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील २५ वर्षांपूर्वी या पुलावर टाकलेल्या पाईप गाळाने भरल्यानेपावसाळ्यात पाणी पाईप वाटे न जाता रस्त्यावरूनच वाहते त्यामुळे वाहतुकीस फार मोठा अडथळा निर्माण होत आहे.

चार वर्षांपूर्वी अरुंद पुलामुळे याच पुलावरून ट्रॅक्टर पलटी होऊन पाटकळ येथील युवकास जीव गमवावा लागला होता.
सदर रस्ता करीत असताना संबंधित विभागाने नंदेश्वर-हुन्नूर या गावातील मुख्य चौकात काँक्रीट रस्ता केला आहे. परंतु भोसे हे गाव मंगळवेढा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असताना देखील चौकात काँक्रिट रस्ता न केल्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे.रस्त्याची उंची वाढल्याने व मुळात धोकादायक असलेला हा पूल संरक्षक दगड गायब झाल्याने अधिकच धोकादायक बनल्याने या पुलाची उंची वाढवून व रस्त्याचे रुंदीकरण करून तसेच भोसे येथील मुख्य चौकात रस्ता कॉंक्रिटीकरण करूनच पुढील रस्त्याचे काम करावे अशी मागणी भोसे येथील ग्रामस्थातून होत आहे.

भोसे येथील मुख्य चौकातील ओढ्यावरील पूल मुळातच अतिशय धोकादायक आहे. आता तरी रस्त्याची उंची वाढल्याने संरक्षक दगड देखील गायब झाले असल्याने रस्ता अरुंद झाल्याने व रस्त्यावरती वळण असल्याने भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित भोसे येथील पुलाचे काम करूनच व भोसे येथील मुख्यचौकातील काँक्रिटीकरण पूर्ण करूनच पुढील रस्त्याचे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल
प्रशांत साळे
अध्यक्ष मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

error: Content is protected !!