Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा,...

भोसे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा, भोसे गटातील सर्वच गावातील नेत्यांचा, नागरिकांचा पाठिंबा

भोसे | प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाढत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. गटातील सर्वच गावांमधून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे निवडणूक लढतीत त्यांचे पारडे सध्या जड झाल्याचे बोलले जात आहे. लोणार, मानेवाडी, रेवेवाडी, पडोळकरवाडी आदी गावांमधील ज्येष्ठ नेतेमंडळी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी नुकताच मोठ्या संख्येने प्रदीप खांडेकर यांना जाहीर पाठिंबा दिला. विविध समाजघटकांतील नागरिक त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक पातळीवरील विकासकामांचा अनुभव, सातत्याने जनतेशी असलेला संपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेले प्रयत्न यामुळे खांडेकर यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी कायम लक्ष दिल्याचे मतदारांकडून सांगितले जात आहे. याशिवाय भोसे जिल्हा परिषद गटातील उर्वरित गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर प्रदीप खांडेकर यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विविध गावांमध्ये होत असलेल्या बैठका, प्रचार फेऱ्या आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे भाजपचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे.

प्रदीप खांडेकर यांनी मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, जनतेने दाखवलेला विश्वास मी विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. भोसे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हेच माझे प्रमुख ध्येय असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करत राहीन, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. एकूणच भोसे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून, निवडणूक वातावरणात त्यांच्या विजयाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत...

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले....

माळशिरस येथील प्रभू विश्वकर्मा मंदिराच्या जागेवरून वाद चिघळला; लोहार समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनांची लाट

माळशिरस / प्रतिनिधी : लोहार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु विश्वकर्मा मंदिरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवरून माळशिरस येथे मोठा वाद निर्माण झाला असून,...

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

error: Content is protected !!