Homeउद्योगनंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी दोस्ती चायनीज सेंटर सेवेत, उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ठरावी, अशा वातावरणात दोस्ती चायनीज सेंटरचे उद्घाटन उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडले. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा गावाच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात नव्या अध्यायाची सुरुवात करणारा ठरला. या नव्या उपक्रमाचे उद्घाटन देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे, वसंत बंडगर, श्री माऊली पतसंस्थेचे संस्थापक आण्णासाहेब बंडगर, तसेच सेंटरचे मालक विजय सलगर उपस्थित होते. याशिवाय मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, उद्योजक अभिमान शिंदे,मेजर दत्ता सलगर, गणेश जोरवर-पाटील आणि बाबुराव ठोंबरे, विक्रम कांबळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

उद्घाटन सोहळ्यावेळी नंदेश्वर गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत, अशा उपक्रमांमुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे मत व्यक्त केले.

दोस्ती चायनीज सेंटरच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, चविष्ट आणि स्वच्छ खाद्यपदार्थ देण्यावर विशेष भर दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत उत्तम सेवा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या नव्या चायनीज सेंटरमुळे नंदेश्वर परिसरातील खाद्यसंस्कृतीला नवे रूप मिळणार असून, नागरिकांना आता दर्जेदार चायनीज पदार्थ स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!