नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दोलतडेवस्ती, नंदेश्वर-भोसे रोड, नंदेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. इंदुबाई दोलतडे यांचे दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले होते.
पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत श्री. ह. भ. प. राम महाराज आलदर (खुपसंगी) यांची कीर्तन सेवा तसेच नंदेश्वर, भोसे व खुपसंगी भजनी मंडळाचा हरिनाम जागर होणार आहे.

तसेच मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्री. ह. भ. प. प्रदीप महाराज पाटील (बोईसर) यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दुपारी १२.१५ वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व भाविकांनी उपस्थित राहून कै. इंदुबाई (नानी) दोलतडे यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन दोलतडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.























