Homeसामाजिकधनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मंगळवेढा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. समाजाच्या न्याय्य व घटनात्मक हक्कांसाठी सातत्याने लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू असून, या प्रश्नासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची आहे. राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने प्रभावी व भक्कमपणे युक्तिवाद करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या आंदोलनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला ST आरक्षण लागू करण्याबाबत आश्वासन दिले होते. तसेच सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे या आश्वासनांची पूर्तता करून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी समाजबांधवांनी केली.

धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने स्पष्ट व ठाम भूमिका घ्यावी. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात धनगर समाजाच्या घटनात्मक हक्कांच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद करावा. शासनाच्या वतीने अनुभवी व सक्षम कायदेपंडितांची नियुक्ती करून प्रकरण भक्कमपणे मांडावे.

देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय घ्यावा. केंद्र व राज्य शासनामध्ये आवश्यक समन्वय साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. तसेच न्यायालयीन निकाल प्रतिकूल ठरल्यास धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपलब्ध कायदेशीर व प्रशासकीय पर्यायांचा Plan-B शासनाने तयार ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली.

तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेऊन ते मुख्यमंत्री व संबंधित शासन विभागांकडे पाठवावे आणि धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली.

“धनगर समाजाच्या न्याय्य व घटनात्मक हक्कांचा सन्मान राखून ST आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. अन्यथा सकल धनगर समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य प्रदीप वसंत खांडेकर, नितीन मेटकरी, रासपचे युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी, सरपंच शिवाजी सरगर, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी, रामचंद्र सलगर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रविकिरण सुरेश कोळेकर, ॲड. विक्रमसिंह कृष्णा मासाळ, आप्पासाहेब हरिदास मेटकरी, ॲड. यशवंत दवले, आबासाहेब खांडेकर, मल्हार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे, आनंदा तुळशीराम डोईफोडे, अंकुश ठेंगिल, सुरेश गिरजाप्पा मेटकरी, राहुल पांडुरंग ढेकळे, भीमराव किसन राऊत, राजेंद्र हरिचंद्र येडगे, अजित निवृत्ती कोळेकर, बंडू करे, बापुराव मधुकर कोळेकर, राहुल भीमराव सलगर, राजन रखमाजी ठेंगील, अनिल रामकृष्ण खरात, राजेंद्र उद्धव चौगुले, महेश लक्ष्मण सलगर, हनुमंत कृष्णा सोलंकर, सिद्धनाथ सलगर, ओंकार घोडके, विजय प्रकाश रेवे, दीपक शंकर चौगुले, नानासो भानुदास कोळेकर, गणेश मासाळ, सौदागर कुलाळ, संतोष कुलाळ, बापू बोरकर, सिद्धेश्वर सरगर, मदन चौगुले, वैभव दत्तात्रय गडदे, बंडू दशरथ मेटकरी, सुमित सुनील सोनवणे, अश्विनी तुकाराम लोखंडे, समाधान खांडेकर, पांडुरंग बिरा कोकरे, औदुंबर पाटील, विजय होनमाने, मनोज ढेंगिल, अंकुश केराप्पा गरंडे, नंदू कुलाळ, दत्तात्रय दादा माने यांच्यासह सकल धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

error: Content is protected !!