Homeमहत्त्वाचेनंदेश्वर येथे अवकाळी पावसाचा मोठा फटका; बेदाणे शेडचे नुकसान, वीज पडून गाय...

नंदेश्वर येथे अवकाळी पावसाचा मोठा फटका; बेदाणे शेडचे नुकसान, वीज पडून गाय दगावली, आ.समाधान आवताडे यांनी पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीच्या प्रशासनाला सूचना

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादनासाठी उभारण्यात आलेल्या बेदाणे शेडचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. याचदरम्यान नंदेश्वर येथील शेतकरी धोंडीराम गरंडे यांची गाय वीज पडून मृत्यूमुखी पडली व तसेच नंदेश्वर येथीलच प्रसाद कसबे यांची तीन जनावरे अवकाळी पावसामुळे दगावली असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार समाधान आवताडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी प्रांत अधिकारी बि.आर.माळी, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष येताळा भगत, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब निकम,मंडल कृषी अधिकारी बालाजी टेकाळे, कृषी पर्यवेक्षक ढाने, सहाय्यक दिपक कोकरे, तलाठी महेश राऊत, पशुधन विकास अधिकारी कुंभार, माजी नामदेव जानकर, दादासाहेब दोलतडे, अशोक चौंडे, भारत गरंडे, दामाजी बंडगर, राहुल कसबे, ज्ञानेश्वर गरंडे, जयसिंग कांबळे, दत्ता साबणे, नानासाहेब बंडगर, मायाप्पा गरंडे, आण्णासाहेब बंडगर, आण्णासाहेब पाटील, सिद्धेश्वर डांगे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणाल नाही – आ. समाधान आवताडे
यावेळी आमदार समाधान आवताडे म्हणाले, नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. प्रशासनाने पंचनामे जलद गतीने पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

आमदार आवताडे यांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आदेश देत, नुकसानग्रस्त पिकांचे, घरांचे तसेच मृत जनावरांचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पंढरपूर–मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व बाधितांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून रस्ते दुरुस्तीचा धडाका; बापूसाहेब गरंडे यांची सामाजिक बांधिलकी, नंदेश्वर गावासह परिसरात चर्चा

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. खड्डेमय झालेल्या या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी...

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व...

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या...

अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणासोबतच वारकरी संस्कारांचे मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम, नंदेश्वर...

नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

error: Content is protected !!