Homeसामाजिकश्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव,...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक समाजाच्या वतीने सहभागी होण्याचे आवाहन

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांच्या १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२६ ते शनिवार दि. ०५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यास राज्यभरातील भक्त भाविकांची मोठी उपस्थिती राहणार आहे.

सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्रावण साधन सप्ताहात भक्तीविजय, एकनाथी भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, श्री बाळकृष्ण माऊली चरित्रामृत तसेच श्री बाळकृष्ण माऊली स्तवन स्त्रोत या पवित्र ग्रंथांचे पारायण करण्यात येणार आहे. या माध्यमातून भक्ती, साधना, नामस्मरण आणि संतसेवेचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

इंचगिरी ते नंदेश्वर पायी दिंडी
श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांच्या १२५ व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार दि. ०१ सप्टेंबर ते गुरुवार दि. ०३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रीक्षेत्र इंचगिरी ते श्रीक्षेत्र नंदेश्वर असा भव्य पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिंडीमध्ये गुरुबंधू-भगिनी, साधक, वारकरी व भक्त भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, नामस्मरण व भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे.

हत्तीवरून माऊलीची भव्य मिरवणूक
शुक्रवार दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री माऊलींच्या पालखीची व प्रतिमेची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमुळे श्रीक्षेत्र नंदेश्वर नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार असून, विविध ठिकाणी भाविकांकडून माऊलींचे दर्शन व स्वागत करण्यात येणार आहे.
यानंतर रात्री १२ वाजता श्री माऊली व भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. जन्मोत्सवाच्या वेळी मंदिर परिसरात नामघोष, भजन, कीर्तन व विविध धार्मिक विधींमुळे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

पुष्पवृष्टीने होणार सोहळ्याची सांगता
शनिवार दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री माऊलींवर पुष्पवृष्टी करून या भव्य जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. या निमित्ताने दूरवरून येणाऱ्या भक्त भाविकांसाठी हा सोहळा आध्यात्मिक आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

देवसागर साधक समाजाच्या वतीने सहभागी होण्याचे आवाहन
श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे होणारा हा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव सोहळा भक्ती, साधना, संतसेवा आणि गुरुसेवेची परंपरा अधिक दृढ करणारा ठरणार आहे. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच गुरुबंधू-भगिनींनी भक्ती व संतसेवा करून आपले पारमार्थिक जीवन सफल करावे, असे आवाहन देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय), श्रीक्षेत्र नंदेश्वर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!