Homeताज्या बातम्याअनिल सावंत यांची प्रचारात आघाडी; पंढरपूर शहरात काढलेल्या पदयात्रेस उत्तुंग प्रतिसाद

अनिल सावंत यांची प्रचारात आघाडी; पंढरपूर शहरात काढलेल्या पदयात्रेस उत्तुंग प्रतिसाद

टीम सोलापूर आजतक
पंढरपूर शहरात काढलेल्या पद यात्रेस अनिल सावंतांना उत्तुंग प्रतिसाद; पायाभूत सुविधाही नसल्याच्या नागरिकांनी केल्या तक्रार..
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची आज शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पंढरपूरमध्ये पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

सकाळी आठ ते दुपारी 1 या वेळेमध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेमध्ये कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. प्रचारार्थ आयोजित केलेल्या संपर्कदौरा आणि पदयात्रेला सरगम चौकापासून सुरुवात करण्यात आली. सरगम चौकापासून सुरू झालेली ही यात्रा पुन्हा सरगम चौकामध्ये येऊन थांबली. यामध्ये, कुंभार गल्ली, शिंदेनगर, कैकाडी महाराज मठ, दाळे गल्ली, झेंडे गल्ली, कडबे गल्ली, तेले गल्ली, कर्नल भोसले चौक आणि पुन्हा सरगम चौक असा या यात्रेचा रुठ ठेवण्यात आला होता.

या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर अभंगराव, आम आदमी पार्टीचे जील्हाध्यक्ष यम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, माजी तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना शरद जोशी पक्षाचे शिवाजी नागटिळक, यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.
पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अनिल सावंत यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनिल सावंत यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला असून, नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेत हजोरोंच्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी सहभागी झाले होते.
सरगम चौकापासून सुरू झालेली ही यात्रा कुंभार गल्ली, शिंदेनगर, कैकाडी महाराज मठ, दाळे गल्ली, झेंडे गल्ली, कडबे गल्ली, तेले गल्ली, कर्नल भोसले चौक आणि पुन्हा सरगम चौक असा प्रवास करून संपन्न झाली.

या पदयातत्रेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी विविध नागरिकांशी चर्चा केली. विविध क्षेत्रातले छोटे व्यापारी, ऑटोमोबाईल गॅरेज, पेंटिंग वर्कर्स, व्हील अलाइनमेंट दुकाने, पान टपरी, छोटे हॉटेल्स व्यवसाय, अशा अनेक व्यायसायिकांशी अनिल सावंत यांनी चर्चा करून, समस्या जाणून घेतल्या.
महागाई, जीएसटीमुळे पूर्वीसारखा व्यवसाय राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया या व्यापारी वर्गांनी नोंदल्या. विविध गल्लीमधून पदयात्रा जात असताना स्थानिक नागरिकांनी पायाभूत सुविधांचीही सोय नसल्याच्या तक्रारी केल्या.
अनेक गल्लीमध्ये गटारीची, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची सोय नसल्याचं नागरिक सांगत होते. समाधान आवताडे जिंकून आल्यानंतर, एकदाही, इकडे फिरकले नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या.
या विधानसभेमध्ये मला संधी द्या, पायाभूत सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, गटारी, स्वच्छता या सगळ्या समस्या निश्चितपणे कायमच्या सोडवल्या जातील. अशी आश्वासने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी स्थानिक नागरिकांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!