Homeताज्या बातम्याकौतुकास्पद...जि.प. प्राथमिक शाळा बंडगरवाडी (नंदेश्वर) च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व मंथन परीक्षेत घवघवीत...

कौतुकास्पद…जि.प. प्राथमिक शाळा बंडगरवाडी (नंदेश्वर) च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व मंथन परीक्षेत घवघवीत यश

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बंडगरवाडी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ तसेच मंथन राज्यस्तरीय परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेमध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. संचित लेंडे याने शिष्यवृत्ती परीक्षेत २४२ गुण मिळवत मंथन परीक्षेत २५६ गुणांसह केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच अदिती क्षीरसागर हिने शिष्यवृत्ती परीक्षेत २२० गुण व मंथन परीक्षेत २५० गुणांसह केंद्रात द्वितीय क्रमांक, तर प्राजक्ता शिंदे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत २०८ गुण व मंथनमध्ये २१४ गुणांसह केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला.
याशिवाय आर्या माने हिने शिष्यवृत्तीमध्ये १९४ गुण, शौर्य कांबळे याने १७४ गुण, आबा बंडगर याने १३६ गुण, तर मानसी गरंडे हिने मंथन परीक्षेत १११/१५० गुण मिळवत केंद्रात चौथा क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम राखली.

या यशामागे मुख्याध्यापक तानाजी लेंडवे, मार्गदर्शक शिक्षक प्रदीपकुमार यादव, महादेव क्षीरसागर व प्रकाश पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक राजाराम कवळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत घेत ही यशस्वी कामगिरी साध्य केली. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!