Homeताज्या बातम्यामेल्यावर मदत करून काय उपयोग...मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा उपाययोजना करा

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून दिलासा दिला आहे. मात्र या घटनेनंतर आता जिल्हाभरातील रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विहिरींवर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वेळेत उपाययोजना केल्यास निष्पापांचे जीव वाचतील
शासनाकडून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे ही मानवतेची बाब असली, तरी अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक महत्त्वाच्या असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लाखो रुपयांची मदत देण्याऐवजी त्याच निधीतून धोकादायक विहिरींना संरक्षण भिंती, लोखंडी कठडे किंवा त्या विहिरी बुजवण्याचे काम केल्यास अनेक निष्पापांचे जीव वाचू शकतात, अशी भावना व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक गावांच्या हद्दीत रस्त्याच्या अगदी कडेला अशा धोकादायक विहिरी असून, त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी या विहिरी मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तांदुळवाडीसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने केवळ मदत जाहीर करण्याऐवजी प्रतिबंधात्मक कामांवर भर देणे काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नंदेश्वर येथील धोकादायक विहीर बुजविनेच महत्वाचे
याच पार्श्वभूमीवर नंदेश्वर गावातील एक गंभीर बाब समोर आली आहे. नंदेश्वर-जुनोनी मार्गालगत गावाच्या अगदी जवळच एक धोकादायक विहीर असून, सध्या त्या परिसरातून राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाचे काम विहिरीच्या अत्यंत जवळून जात असल्याने रस्त्याची साईडपट्टीच विहिरीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावरच श्री बाळकृष्ण विद्यालय व महाविद्यालय ही मोठी शैक्षणिक संस्था असून, दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या विहिरीची तातडीने दखल घेऊन ती बुजवावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

error: Content is protected !!