Homeताज्या बातम्यानंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक वादळी ठरणार? दुरंगी, तिरंगी की चौरंगी लढत? इच्छुकांनी सुरू...

नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक वादळी ठरणार? दुरंगी, तिरंगी की चौरंगी लढत? इच्छुकांनी सुरू केली जोरदार तयारी; गावातील चौका-चौकात रंगल्या राजकीय चर्चा

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून, यंदाची निवडणूक चुरशीची आणि वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या गावात प्रत्येक चौकात, कट्ट्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.

सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची विविध प्रभागांमध्ये उमेदवारांची चाचपणी
नंदेश्वर ग्रामपंचायतीचा सरपंच पहिल्यांदाच जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही जण उघडपणे निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे, तर काहींनी शांतपणे, गनिमी काव्याने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी थेट दुरंगी लढत होण्याची शक्यता असली, तरी काही प्रभागांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी संघर्ष पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगत आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपली ताकद वाढवण्यासाठी मतदारांशी संपर्क साधत असून, सामाजिक कार्यक्रम, बैठका आणि गाठीभेटींचे प्रमाण वाढले आहे.

मतदारही यंदा विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या तयारीत
गावाच्या विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा सुरू असून, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व मूलभूत सुविधा हे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहतील, अशी शक्यता आहे. मतदारही यंदा विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.एकूणच, नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक केवळ औपचारिक न राहता राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत राजकीय हालचाली अधिक वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!