Homeताज्या बातम्यानंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच, सदस्यांचे फोटो

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावातील विविध राजकीय गटांमध्ये बैठका, चर्चासत्रे आणि रणनीती आखण्याचे काम सुरू असून, गावातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.

भावी सरपंच, सदस्यांचे स्टेटस झळकू लागले
सध्या सोशल मीडियावर ‘भावी सरपंच’, ‘भावी सदस्य’ तसेच विविध प्रभागांतील संभाव्य उमेदवारांचे पोस्टर मोठ्या प्रमाणावर झळकू लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, गावात प्रचाराचे वातावरण आधीच निर्माण झाले आहे.
गावातील मतदारांमध्येही यंदाच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असून, विकासाच्या मुद्द्यांवर कोण उमेदवार जनतेसमोर विश्वासार्ह भूमिका मांडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक तरुणांनीही निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केल्याने यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर नसला तरी घडामोडींना वेग
दरम्यान, अधिकृत निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी गावातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक ही तालुक्यात चर्चेचा विषय ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!