Homeताज्या बातम्याशिरनांदगी येथे पोलीस बांधवांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर...

शिरनांदगी येथे पोलीस बांधवांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; नवनियुक्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

नंदेश्वर / प्रतिनिधी : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिरनांदगी येथे भव्य मिरवणूक काढून गावातील नवनियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप वसंत खांडेकर हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपअधीक्षक लक्ष्मण पांडुरंग जानकर, डॉ. सुलोचनाताई जानकर, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे तसेच गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक बंडू गडदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणारे रकमाजी जकू पडवळे, तानाजी गजानन कोकरे, धनाजी रामचंद्र लवटे, सिद्धू विठ्ठल मेटकरी, श्रीमंत भूताळी कोटे आणि आशा पांडुरंग सरगर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एपीआय सखाराम बिराजदार यांनी केले. त्यांनी या सत्कार सोहळ्यामागील उद्देश स्पष्ट करत गावातील युवकांनी पोलीस व प्रशासकीय सेवांकडे वळून समाजसेवेत योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. सत्कारमूर्ती रकमाजी जकू पडवळे यांनी आपल्या मनोगतातून यशामागील संघर्ष, मेहनत आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, ध्येय निश्चित करण्याचा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत यश संपादन करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले. शिरनांदगी पोलीस मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा सोहळा गावासाठी अभिमानास्पद ठरला असून युवकांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!