Homeताज्या बातम्याअनिल सावंत यांच्या रूपाने शरद पवार गटाचा आमदार व्हावा ही जनतेची इच्छा...

अनिल सावंत यांच्या रूपाने शरद पवार गटाचा आमदार व्हावा ही जनतेची इच्छा – सुनिल वेळापुरे

मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या रूपाने या मतदारसंघाला सक्षम नेतृत्व करणारा म्हणून उमेदवार शरद पवार साहेबांनी दिला आहे. अनिल सावंत यांना मत म्हणजे शरद पवार साहेब यांना मत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शरद पवार यांच्या विचाराचा आमदार निवडून देण्यासाठी जनतेची इच्छा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंधळगावचे नेते सुनील वेळापूरे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे वेळापुरे म्हणाले, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली व त्याचबरोबर माढ्याचे खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शरद पवार यांच्या विचाराचे सर्व जुने जाणते नेते एकत्रित येऊन एक दिलाने काम करीत आहेत.
अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात पेशवाई राहणार नाही. त्यामुळे या भागातील अनिल सावंत यांना विजयी करून काम करण्याची संधी मिळवून देण्याची इच्छा सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. त्यांनी नेहमी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य केले. अनिल सावंत हे बारा महिने २४ तास जनतेसाठी समर्पित कार्यकर्ता म्हणून राबतात.
आज पर्यंत शरद पवार साहेबांनी जनतेसाठी समर्पित राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून अनिल सावंत हे आहेत. अनिल सावंत यांनी लवंगी सारख्या उजाड माळावर साखर कारखाना उभा केला. त्या माध्यमातून हजारो बेरोजगार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना उसाचा चांगला दर देण्याची परंपरा कायमच ठेवली. शेतकरी देशातील अन्नाची गरज भागवू शकतो. शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या कांदा, सोयाबीन व कापूस सारख्या मालाला चांगला भाव दिला होता. शेतकऱ्यांना ७० हजार कोटीची कर्जमाफी देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जाणता राजा म्हणून शरद पवार साहेबांच्या विचाराचा आमदार व्हावा ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वास सुनील वेळापुरे यावेळी बोलून दाखवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!