Homeसामाजिकबापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील विवध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
बापूसाहेब आडसूळ यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी लोहार समाजाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी आडसूळ यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजाच्या प्रगतीसाठी तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून सदस्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष महेश लोहार, जिल्हाध्यक्ष बालाजी लोहार, उमेश टिंगरे, निखिल लोहार, सौरभ पवार, संदेश बारडोळे, सचिन टिंगरे, नितीन पोफळे आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी व उत्साहपूर्ण होते. उपस्थितांनी बापूसाहेब आडसूळ यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये उत्सुकता, काहींमध्ये नाराजी

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, चक्रानुक्रमानुसार जाहीर झालेल्या आरक्षणामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

error: Content is protected !!