खडकी येथील गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठात दत्त जयंती अनुष्ठान सोहळा उत्साहात संपन्न
नंदेश्वर /प्रतिनिधी – मानवी जीवनात अध्यात्माला अनन्य साधारण महत्व आहे. खरे आत्मिक समाधान अध्यात्मातूनच मिळते. गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांनी गोवा राज्यात श्री दत्त भक्तीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर केला आहे. सुदर्शन महाराज यांच्या प्रचार आणि प्रसाराने गोवा राज्यातील भाविक भक्तांना एक नवा शांतीचा मार्ग मिळाला आहे. त्यांच्या या कार्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करून असे प्रतिपादन गोवा राज्यातील मुरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार संकल्प अमोणकर यांनी केले आहे. खडकी ता.मंगळवेढा येथे गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठात दत्त जयंती अनुष्ठान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आमदार संकल्प अमोणकर बोलत होते. यावेळी स.स.प्रभूदेव महाराज हिप्परगी इंचगिरी मठ, सं.स.आनंद काडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर, गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज हे उपस्थित होते.
आमदार अमोणकर यावेळी म्हणाले की, भारत देशाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेण्याची माझी गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. मी गोवा राज्यातील सुमारे 3000 भाविक भक्तांना स्वखर्चातून पंढरीचे दर्शन घडवून आणले पण स्वतः मात्र दर्शन घेऊ शकलो नव्हतो. पण माझी ही दर्शन घेण्याची इच्छा सुदर्शन महाराज यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे पूर्ण झाली आहे.
गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठात दि. १४ ते बुधवार दि. १८ या पाच दिवसांच्या काळात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला. बुधवार दिनांक 18 रोजी सकाळी नऊ वाजलेपासून प्रवचन आणि किर्तन सेवा प्रारंभ झाली. यानंतर ठीक 12:30 वाजता मठाधिपती सुदर्शन महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले यानंतर पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादनंतर अनुष्ठान सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी दयाघन महाराज पंढरपूर दत्तात्रेय बडे महाराज जामगाव शिवानंद कोरे महाराज सोलापूर, रेवनसिद्ध व्होनमराठे महाराज सोलापूर, मोहनानंद महाराज पुरंदावडे, प्रभूआकळे महाराज डोंगरगाव, दुधी गुरुजी, भाग्योदय महाराज कुर्डूवाडी, शंकर महाराज पंढरपूर, शिवाजी महाराज तनाळी मठ, तुकाराम वाघमारे महाराज किवळे मठ, पोपट पवार महाराज एकतपुर, रामचंद्र पाटील महाराज महमदाबाद, विवेक पार्सेकर, प्रीतम राणे नगरसेवक, उद्योजक दामाजी कोकरे, दत्ताराम सावंत प्राध्यापक अमर गोडसे, ज्ञानेश्वर चोपडे प्रमोद माने सदाशिव नवले अभिजीत ढोबळे दादासाहेब गरंडे, धनाजी गडदे, सुरेश कांबळे, नानासाहेब कटारे,संजय राजपूत, रघुनाथ बेलदार, प्रकाश खंदारे, हौसाप्पा शेवडे, अशोक जाधव, दिलीप कसबे, नामदेव कसबे, शंकर माने,विशाल चौगुले, सुजित कसबे, बंडू चौगुले, विष्णू कसबे, जितेंद्र कसबे, सुरेश कसबे समाधान वाघमारे मर्याप्पा कसबे दामू करणे बंडू साबळे खुशाल रजपूत, बापू मेटकरी, गणेश राठोड हे उपस्थित होते.
