Homeताज्या बातम्यायशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व अँगलमधून चौकशी सुरू

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेली २५ वर्षीय विवाहित रील स्टार रोहिणी निलेश पाराध्ये हिने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने सोशल मीडियावरील तिचे लाखो चाहते, स्थानिक नागरिक आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे असलेल्या प्रसिद्ध ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये मंगळवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार हा हॉटेलचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने मंगळवारीदेखील हॉटेल उघडण्यात आले नव्हते. याच दरम्यान रोहिणी पाराध्ये हिने हॉटेलच्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिकांनी तातडीने तिला मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आंतरजातीय प्रेमविवाहातून सुरू झाला संसार
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. विशेष म्हणजे रोहिणीचा हा दुसरा विवाह असल्याचेही समोर आले आहे. विवाहानंतर हे दाम्पत्य काही काळ पुणे येथे वास्तव्यास होते. त्याच काळात त्यांनी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यास सुरुवात केली होती.

यानंतर ते मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हा व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील दैनंदिन कामकाज, ग्राहकांशी होणारे विनोदी संवाद, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि ग्रामीण जीवनशैलीवर आधारित रिल्समुळे हे दाम्पत्य सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडिओंना हजारो-लाखो व्ह्यूज मिळत होते. या लोकप्रियतेचा त्यांच्या व्यवसायालाही मोठा फायदा झाला होता.

यशाच्या शिखरावर असतानाच टोकाचे पाऊल
व्यवसायात यश, सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि कौटुंबिक संसार सुरळीत सुरू असल्याचे चित्र असतानाच रोहिणीने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आत्महत्येमागे कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात असून, तिच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी तिच्या रिल्सची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू
या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात ADR (Accidental Death Report) दाखल करण्यात आला असून, पोलीस प्रशासनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!