Homeताज्या बातम्यानंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वरची स्नेहल खापे प्रथम, ओम खांडेकर द्वितीय,...

नंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वरची स्नेहल खापे प्रथम, ओम खांडेकर द्वितीय, श्री. बाळकृष्ण विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षेत दैदिप्यमान यश, विद्यालयाचा निकाल ८९.३२ टक्के

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री. बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या दहावी (S.S.C.) बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ८९.३२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे नंदेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदेश्वर केंद्रात श्री बाळकृष्ण विद्यालयाचे वर्चस्व
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही घवघवीत यश मिळवले. या परीक्षेत विद्यार्थिनी स्नेहल संभाजी खापे हिने ९३.२० टक्के गुण मिळवत नंदेश्वर केंद्रासह श्री बाळकृष्ण विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच ओम श्रीकांत खांडेकर याने ९१.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला.

विद्यालयातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सोनाली सुखदेव लवटे — ८८.४०% (तृतीय क्रमांक),आरुषी किसन कसबे — ८५.४०% (चतुर्थ क्रमांक),स्वप्नाली नामदेव गरंडे — ८५.२०% (पाचवा क्रमांक),कोमल दत्तात्रय गरंडे — ८३.२०% (सहावा क्रमांक)
या विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उज्ज्वल यश संपादन केले असून विद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे.

शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन
विद्यालयाच्या या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग, शंका निरसन सत्र आणि वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असल्याचे शिक्षकांनी मार्गदर्शन
केले.

या यशाबद्दल श्री. बाळकृष्ण शिक्षण संस्था, मुख्याध्यापक विठ्ठल एकमल्ली, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच भविष्यातही विद्यालयाची ही यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे नंदेश्वर परिसरात समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!