Homeताज्या बातम्यापंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री...

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय सामंतांकडे मागणी

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांनी राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पंढरपूर येथे स्वतंत्र मराठी भाषा अध्यासन केंद्र स्थापन करणे आणि नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये उद्योग उभारणी करून ती तात्काळ कार्यान्वित करण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे.

स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारणे गरजेचे
बुधवार दि. २७ मे रोजी ना. उदय सामंत हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता अनिल सावंत यांनी त्यांची भेट घेऊन या मागण्या मांडल्या. पंढरपूर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून संत साहित्य, मराठी संस्कृती आणि वारकरी परंपरेचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे येथे मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारल्यास राज्यभरातील अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संत साहित्याचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी चंद्रभागा नदी घाट परिसर तसेच शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी संतांचे विचार, अभंग आणि प्रेरणादायी संदेश प्रदर्शित करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. मंदिर परिसर, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, प्रमुख चौक आणि सुरक्षा ग्रीलवर अभंगांचे फलक उभारल्यास पंढरपूरच्या सांस्कृतिक वातावरणात अधिक भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषा आणि संत साहित्य संवर्धनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तसेच संत तुकाराम विद्यापीठ विविध उपक्रम राबवत असले तरी शासनस्तरावर स्वतंत्र मराठी भाषा अध्यासन केंद्राची स्थापना झाल्यास या कार्याला अधिक बळ मिळेल, असेही अनिल सावंत यांनी म्हटले आहे.

लघु उद्योगांना चालना मिळणे गरजेचे अनिल सावंत यांची मागणी
दरम्यान, पंढरपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीचा विषयही त्यांनी यावेळी जोरकसपणे मांडला. धार्मिक पर्यटनावर अवलंबून असलेल्या पंढरपूर परिसरात लघुउद्योगांना चालना मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपुरातील चुरमुरे, बत्तासे, कुंकू, बुक्का, फोटो फ्रेम, दगडी मूर्ती, खेळणी, बांगड्या यांसारख्या पारंपरिक व्यवसायांना एमआयडीसीच्या माध्यमातून बाजारपेठ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंढरपूर एमआयडीसी तातडीने सुरू झाल्यास स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. धार्मिक पर्यटनासोबत औद्योगिक विकास घडल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मंगळवेढा एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत
याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यात रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. त्यामुळे उद्योग उभारणी झाल्यास स्थलांतर कमी होऊन स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळेल व आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!