Homeताज्या बातम्याज्वारी..गव्हाचं... पीक चांगलं असेल... हुलजंतीत गुरु - शिष्य पालखी भेट सोहळा उत्साहात....

ज्वारी..गव्हाचं… पीक चांगलं असेल… हुलजंतीत गुरु – शिष्य पालखी भेट सोहळा उत्साहात. भाविकांची मांदियाळी; भक्तीमय वातावरणात भंडारा , लोकरची उधळण. लाखो भाविकांची उपस्थिती

टीम सोलापूर आजतक
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुलजंती (ता.मंगळवेढा)येथे गुरू श्री. बिरोबा व शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.लाखो भाविकांनी महालिंगराया -बिरोबाच्या नावानं चांगभलं या गजरात मुक्तहस्ताने भंडारा ,खारीक व लोकरची उधळण केली . मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली..

गेले आठवडाभर हा ऐतिहासिक सोहळा सुरू आहे .दररोज लाखोच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र हुलजंती येथे दाखल झाले होते. शुक्रवारी पहाटेपासून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंडासचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जगातील एकमेव ठिकाण स्वर्गातून शंकर-पार्वती महालिंगरायाच्या मंदिराला पंच शिखराला मुंडास (आहेर) बांधले जाते. हे मुंडास मध्यरात्री शंकर व पार्वती यांच्या कृपने होते.अशी अख्यायिका आहे. या मुंडासचे (ध्वज) दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने दाखल होतात. अमावस्येच्या रात्री शिवपार्वती येथे भूकैलास हुलजंती होई जन्माला येऊन एकदा मुंडास पाही याचं उक्तीप्रमाणे लाखोच्या संख्येने भाविक दिवसभर दर्शन घेत होते .तसेच (गुरु) बिरोबा -महालिंगराया( शिष्य )यांच्या पालखी भेट सोहळ्यासाठी नयनरम्य दर्शनासाठी मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात लाखो भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी ढोल, कैताळ नगाराच्या गजारात आकाशात भंडारा व लोकरची उधळण करत बिरोबा महालिंगरायाच्या नावानं चांगभल या जयघोषात पालखी भेट सोहळा पार पडला. दरम्यान यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, देवस्थान पंच कमिटी, स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत, महसूल, पाणीपुरवठा, आरोग्य या विभागाने प्रयत्न केले. मठ व धार्मिक परोपकारी व्यक्तीने दासोह प्रसादाची सोय केली होती.भाविकांनी याचा लाभ घेतला.
या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, चडचण येथील शिरडोन येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होतो.
एक महान चरित्र,वीर सिद्धपुरुष नायक मराठी भुमीमध्ये जन्म घेऊन सर्व भाषेच्या सीमा पार करून कन्नड ,मराठी, तेलगू लोकांच्या मनावर आजतागायत निर्विवाद अधिराज्य गाजवतो. याची अनुभूती या यात्रेत मिळते. महालिंगरायाच्या भक्तीचा महिमा डंका महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,गोवा या राज्यात आहे.
***************
पालख्यांचा भेट सोहळा झाल्यानंतर पुजाऱ्यांनी भाकणूक वर्तवली. ज्वारी, गव्हाच चांगलं पीक असेल, पौर्णिमेच्याआत पाऊस पडेल, पुढचं साल चांगल आहे. बैलासाठी चांगले दिवस येतील,अशी पुजाऱ्यांनी भविष्यवाणी(भाकणुक )वर्तवली.यावेळी
लाखो भाविकांनी श्री महालिंगरायाच्या नावानं चांगभलंचा गजर व लोकर, खारीक, खोबर भंडाऱ्याची उधळण भक्तीभावाने केली. या भाकणुकीला विशेष महत्व असते.
*********************

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

error: Content is protected !!