Homeमहाराष्ट्रराजकारणात खळबळ होईल, ज्वारीच्या पिकाला समाधानकारक पाऊस होईल

राजकारणात खळबळ होईल, ज्वारीच्या पिकाला समाधानकारक पाऊस होईल

लाखो भाविकांच्या उपस्थितीत बिरोबा व महालिंगराया या गुरु शिष्याचा पालखी भेट सोहळा संपन्न

टीम सोलापूर आजतक

हुन्‍नूर येथील गुरु-शिष्य भेटीच्या या सोहळ्यात दरवर्षी देवाचा जावळाचा पुजारी भाकणूक सांगण्याची प्रथा असते. यानुसार एक मुगार आबादान यावर्षी शेळी मेंढीला सोन्याचे दिवस येतील, अन्नधान्य महागेल, राजकारणात खळबळा होईल, पौर्णिमेच्या आत बाहेर पाऊस पाणी राहील अशी भाकनूक सांगण्यात आली.
हुन्नुर ता.मंगळवेढा येथील श्री बिरोबा व हुलजंती येथील महालिंगराया यांचा भेटीचा नयनरम्य सोहळा बुधवार दि.23 रोजी भेटीच्या मैदानावर पार पडला. भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत अनेक भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. कर्नाटक राज्य तसेच सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी या गुरु शिष्य भेटीच्या सोहळ्यास हजेरी लावली होती. श्री बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्यदैवत असल्यामुळे या भेट सोहळ्यासाठी मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्हा आणि सबंध महाराष्ट्रातून धनगर समाजाचे भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.

हुन्नुर येथील श्री बिरौबा हे हुलजंती येथुन महालिंगरायाची पालखी घेऊन धावत पळत भाविक हुन्नुर गावाशेजारील ओढ्यात गुरूच्या भेटीसाठी दाखल झाले होते. श्री बिरोबा मंदिरातून ढोल ताश्याच्या गजरात वाजतगाजत बिरोबाची पालखी घेऊन भाविक आलेनंतर महालीगरायाची पालखी ओढ्यातून घेऊन भाविक भेटीच्या मैदानावर आले. भेटीच्या मैदानावर गुरु शिष्यांच्या दोन्ही पालख्या आलेनतर सर्वप्रथम बैलाची भेट झाली व त्यानंतर अनेक भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या गजरात खोबरे, लोकर, भंडारा आदींची उधळण करत मुक्तपणे भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत अनेक भाविकांच्या साक्षीने हा गुरु शिष्य भेट नयनरम्य सोहळा पार पडला.
भाविक भक्त पालखीचे स्वागत करतात भेट होताच भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला परत एकदा भंडारा लोकर खोबऱ्याची उधळण करण्यात येते. सर्वांच्या तोंडी बिरोबा महालिंगराया च्या नावानं चांगभलं ऐकायला मिळत होते हा भेटीचा सोहळा वर्षातून एकदा भरत असतो.
गेल्या दहा दशकापासून गुरु व शिष्याची भेटीची परंपरा चालू आहे यानंतर भाविकांनी देवाला नारळ, भंडारा, पुरण पोळीचा नैवद्य दाखवण्यात आला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान पंच कमिटी,व ग्रामपंचायत ने प्रयत्न केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.43D31302.1753020326.153D78F8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5f861402.1753019051.56D32C09 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1753014382.1227c69d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.8ea72917.1753014168.b5378d2 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.43D31302.1753020326.153D78F8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5f861402.1753019051.56D32C09 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c3a72917.1753014382.1227c69d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.8ea72917.1753014168.b5378d2 Source link
error: Content is protected !!