Homeराजकीयलोकहितावह विकासकामांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या विश्वासात पात्र राहणे गरजेचे, माजी आमदार प्रशांत...

लोकहितावह विकासकामांना प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या विश्वासात पात्र राहणे गरजेचे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे आवाहन

मंगळवेढा नगरपरिषदेतील नूतन नगरसेवकांचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार, दिनदर्शिकेचेही यावेळी करण्यात आले उद्घाटन

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी – सर्वसामान्य नागरिकांनी टाकलेल्या विश्वासात पात्र राहून लोकहिताची कामे व शहराच्या विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविलेल्या नूतन नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नूतन नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सर्वांगीण विकासकामांना प्राधान्य द्या
मार्गदर्शन करताना परिचारक म्हणाले की, नगरसेवक ही जबाबदारी सन्मानासोबतच मोठी कर्तव्यभावना घेऊन येते. नागरिकांच्या मूलभूत गरजा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम केल्यासच जनतेचा विश्वास कायम राहतो. मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व नगरसेवकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रामाणिक व पारदर्शक कारभार केल्यास नगरपालिकेची प्रतिमा अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्कार समारंभास मा.आ. प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांची गर्दी
कार्यक्रमास नगरपालिकेचे नूतन नगरसेवक, माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरीशंकर बुरकुल, प्रविण खवतोडे व नितीन मेटकरी यांचा सत्कार माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर, माजी चेअरमन रामकृष्ण नागणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती काशीनाथ पाटील, न.पा. शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार हावनाळे, माजी न.पा. पक्षनेते अजित आप्पा जगताप, माजी जि.प. सदस्य नामदेव जानकर, माजी संचालक भारत पाटील यांच्यासह दामाजी शुगरचे संचालक राजेंद्र पाटील, भारत बेदरे, गोपाळ भगरे, गौडाप्पा बिराजदार, महादेव लुगडे, दिगंबर भाकरे उपस्थित होते. तसेच तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, कन्हैय्या हजारे, कांतीलाल ताटे, पप्पू स्वामी, माधवानंद आकळे, विष्णू मासाळ, सचिन चौगुले, सिध्देश्वर मेटकरी आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी नूतन नगरसेवकांचे अभिनंदन करून मंगळवेढा शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!