Homeराजकीयमंगळवेढ्यात खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा

मंगळवेढ्यात खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा

मंगळवेढा (प्रतिनिधी) – माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे आज ८४ उत्कृष्ट विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक व पत्रकारांचा पुरस्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा तालुका शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील जवाहरलाल शेतकी हायस्कूल येथे आज सकाळी ठीक अकरा वाजता पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या उचित्य साधून ८४ उत्कृष्ट विद्यार्थी, ८४ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला, ८४ जेष्ठ नागरिक व तसेच मंगळवेढा तालुक्यातील पत्रकारांचा पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे असणार आहेत. माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व तसेच राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकास्तरीय व तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, कार्याध्यक्ष संतोष रंदवे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमएस धोनीने प्रभाव प्लेअर आयपीएल नियम, बोथट निर्णय दिला

2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर आयपीएल नियमांबद्दल बोलले गेले आहे. उदाहरणार्थ, एका विशिष्ट संघाने गोलंदाजीची डाव पूर्ण केल्यावर, तो एका गोलंदाजांपैकी एकाला फलंदाजीसह बदलू शकतो....

घड्याळ: हट्टी अंडी शेल्स सोलून काढण्यावर हे तज्ञ हॅक इंटरनेट बोलत आहेत

फूड हॅक्स आम्हाला आश्चर्यचकित करण्यास कधीही अपयशी ठरतात. थर्मॉसच्या आत अॅल्युमिनियम-लपेटलेल्या पॅराथास ठेवण्यापासून जेणेकरून ते तूपात चमच्याने चमच्याने उबदार राहतात जेणेकरून मध त्यांच्यात अडकणार...

error: Content is protected !!