Homeसामाजिकमहाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यास मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाज...

महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यास मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे – धनाजी गडदे

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी किल्ले वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मंगळवेढा तालुका प्रतिनिधी धनाजी गडदे यांनी केले आहे.

महाराजा यशवंतराव होळकर हे केवळ होळकर घराण्याचे शासक नव्हते, तर इंग्रज सत्तेला थेट आव्हान देणारे आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे महान योद्धा होते. त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित हा सोहळा म्हणजे इतिहासातील त्या तेजस्वी अध्यायाला अभिवादन करण्याचा दिवस असल्याचे गडदे यांनी सांगितले.हा राज्याभिषेक दिन सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा अधिक भव्य व प्रेरणादायी स्वरूपात साजरा केला जाणार असल्याचेही गडदे यांनी नमूद केले.
आजच्या पिढीने इतिहास केवळ वाचण्यापुरता मर्यादित न ठेवता तो समजून घेऊन आत्मसात करावा, असे मत व्यक्त करत गडदे म्हणाले की, महाराजा यशवंतराव होळकर यांचे जीवन हे स्वराज्य, सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि परकीय सत्तेविरोधातील निर्भीड लढ्याचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजच्या तरुण पिढीस निश्चितच दिशा देणारी आहे.

या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी तसेच इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात अभिवादन सोहळा, ऐतिहासिक विचारमंथन आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ औपचारिक सोहळा नसून इतिहास जागवण्याचा, स्वाभिमान चेतवण्याचा आणि नव्या पिढीत राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही धनाजी गडदे यांनी स्पष्ट केले. मंगळवेढा तालुक्यासह राज्यभरातील नागरिकांनी, युवकांनी व सामाजिक संघटनांनी या राज्याभिषेक दिन सोहळ्यास उपस्थित राहून महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांच्या महान कार्याला अभिवादन करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!