Homeताज्या बातम्यामंगळवेढा तालुक्यात आईसह दोन मुलांचा तलावात पडून दुर्दैवी मृत्यू, मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

मंगळवेढा तालुक्यात आईसह दोन मुलांचा तलावात पडून दुर्दैवी मृत्यू, मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात आज हृदयद्रावक घटना घडली. आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर अचानक काळाने झडप घातली आणि साठवण तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत वैशाली अनिल घोडके (वय 35), श्रेया अनिल घोडके (वय 12) आणि सोहम अनिल घोडके (वय 10) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, वैशाली घोडके आपल्या दोन्ही मुलांसह गावाजवळील साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंढरपुरातील रेस्क्यू टीम बोलावून घेऊन मृतदेह शोधले
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, आई वैशाली घोडके यांचा मृतदेह हाती लागला असून, दोन्ही मुलांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता पंढरपुरातील रेस्क्यू टीम बोलावून घेऊन दोन्ही मुलांचा मृतदेह शोधून काढण्यात आला. तिन्ही मृतदेह मिळाल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

या घटनेमुळे खडकी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील तिघांवर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना साठवण तलाव, विहिरी व खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी...

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

error: Content is protected !!