Homeसामाजिकनंदेश्वरकरांनी साश्रू नयनांनी आपल्या लोकनेत्याला दिला निरोप, दादासाहेब गरंडे यांचे निधन;...

नंदेश्वरकरांनी साश्रू नयनांनी आपल्या लोकनेत्याला दिला निरोप, दादासाहेब गरंडे यांचे निधन; मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती दादासाहेब रामा गरंडे यांचे गुरुवार, दिनांक ५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या निधनाने मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दादासाहेब गरंडे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा संपूर्ण नंदेश्वर गावातून काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान गावातील प्रत्येक चौकात, प्रमुख मार्गांवर आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मोठ्या भावनिक वातावरणात पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.’ दादासाहेब अमर रहें ‘ अशा घोषणांनी परिसर भारावून गेला होता. अत्यंत दुःखद आणि अश्रूंनी भरलेल्या वातावरणात दादासाहेब गरंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादासाहेब गरंडे यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि नेतृत्वगुण यामुळे ते सर्व स्तरांत लोकप्रिय होते.

यावेळी मंगळवेढा तालुक्यातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते मंडळी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी दादासाहेब गरंडे यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दादासाहेब गरंडे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक दशके लोकसेवेसाठी वाहून घेतली. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि दुर्मीळ असा होता. त्यांनी पाच वर्षे सरपंच, पाच वर्षे उपसरपंच तसेच पाच वर्षे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. विशेष म्हणजे त्यांचे नेतृत्व केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता पुढील पिढीपर्यंत पोहोचले. त्यांच्या मुलाने पाच वर्षे सरपंचपद भूषवले, पत्नीनेही पाच वर्षे सरपंच म्हणून कार्य केले, तर सुनेने पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. एवढा मोठा आणि सातत्यपूर्ण राजकीय प्रवास मंगळवेढा तालुक्यातील मोजक्याच कुटुंबांना अनुभवता आला आहे. दादासाहेब गरंडे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही राहिले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची ओळख होती. विरोधकांशीही सुसंवाद ठेवून त्यांनी राजकारणात सुसंस्कृत परंपरा जपली.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. दादासाहेब रामा गरंडे यांचे निधन म्हणजे केवळ एका व्यक्तीचे नाही, तर अनुभव, नेतृत्व आणि लोकांशी नाळ जोडणाऱ्या राजकारणाचे नुकसान आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत सर्व स्तरांतून भावना व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बापूसाहेब आडसूळ यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने सत्कार

सोलापूर / प्रतिनिधी : एकनाथ स्वाभिमानी शिक्षककर्मचारी पतसंस्थाच्या चेअरमनपदी बापूसाहेब आडसूळ यांची निवड झाल्याबद्दल लोहार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. समाजातील...

नंदेश्वर येथे वनपरिक्षेत्रातील वनराईला भीषण आग; अनेक वृक्ष जळून खाक, सुस्त वनविभाग कधी जागा...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर येथील वनपरिक्षेत्रातील वनराईला गुरुवार दि. ४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. पहाटेच्या वेळी...

सखाराम लोहार यांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (तंत्रज्ञ १) पदावर पदोन्नती, सर्व स्तरातून...

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मधील कर्मचारी तथा नंदेश्वर गावचे भूमिपुत्र सखाराम उर्फ दादासाहेब लोहार यांची तंत्रज्ञ १ या पदावर...

तोतया विद्यार्थी..नंदेश्वर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर तोतया विद्यार्थ्यांचा मोठा पर्दाफाश; २० जणांवर गुन्हा, १०...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) : येथील श्री बाळकृष्ण विद्यालय या दहावीच्या परीक्षा केंद्रावर मूळ विद्यार्थ्यांऐवजी तोतया विद्यार्थी बसवून परीक्षा देण्याचा गंभीर...

सलाम पत्रकारितेला…एपस्टीन फाइल् प्रकरण उघड करणाऱ्या ज्युली के. ब्राऊन यांची धाडसी पत्रकारिता

अमेरिकेतील अब्जाधीश वित्तीय दलाल जेफ्री एपस्टीन याच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरणाला नव्याने उजाळा देण्याचे श्रेय तपास पत्रकार ज्युली के. ब्राऊन यांना दिले जाते. सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेखाली...

error: Content is protected !!