नंदेश्वर /प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावतीने भैरवनाथ शुगरचे व्हा चेअरमन अनिल सावंत यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपुर – मंगळवेढा कार्याध्यक्ष संतोष रंधवे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख महावीरनाना देशमुख, पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे आदी पदाधिकारी तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि गावचे युवक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***********
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा तालुक्यातील व तसेच पंढरपूर तालुक्यातील मुख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे देखील मुख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
